Year: 
2014
Year Section: 
World
Slideshow Data: 
Year Ender Title: 
ISISची दहशत
Image: 
Caption: 

5 जूनचा तो दिवस जेव्ही सुन्नी मिलिटंट्सच्या एका ग्रुपनं मुस्लिम देश इराक आणि परिसरात दहशतवादाचा हा:हाकार माजवला. सीरिया पेटलं... शेकडोंना मारलं, हजारोंचं अपहरण केलं. इसिस या दहशतवादी संघटनेनं जगातील अनेक देशांमध्ये दहशतीचं वातावरण पसरत आपला काळा झेंडा पसरवला. अमेरिकेच्या पत्रकाराची हत्या केली. 

 

Year Ender Title: 
MH370 - मलेशियन फ्लाइटचं गूढ
Image: 
Caption: 

8 मार्चला पहाटे 2.15ला जे घडलं त्यानं संपूर्ण जग हादरलं. 239 प्रवासी घेऊन निघालेलं एमएच-370 फ्लाइट अचानक बेपत्ता झालं. मलेशियन एअरलाइन्सचं फ्लाइट 370 क्वालालांपूरहून बीजिंगसाठी निघालं आणि बेपत्ता झालं. त्यानंतर बरेच महिने समुद्रात त्याचा शोध घेणं सुरू होतं. 

 

Year Ender Title: 
यूक्रेनमधील क्राइसेस!
Image: 
Caption: 

यूक्रेनमध्ये तत्कालिन राष्ट्रपती व्हिक्टर यानुकोविच यांच्याविरुद्ध 22 फेब्रुवारीला स्थानिक नागरिकांनी उठाव केला. या संपूर्ण घटनेत 100 नागरिकांचा मृत्यू झाला. रशियानं आणखी त्यांच्या संकटात भर घातली. संयुक्त राष्ट्रानं मग जनमतामुळं त्यांच्या विरुद्ध मत दिलं. आताही यूक्रेन आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय. 

 

Year Ender Title: 
MH17 दुर्घटना - दुसऱ्याच्या युद्धात निष्पापांचा बळी
Image: 
Caption: 

MH17 दुर्घटना - दुसऱ्याच्या युद्धात सैन्य जखमी

मलेशियन एअरलाइन्स बोइंग 777नं अॅआम्सटरडॅमच्या Schiphol विमानतळावरून 17 जुलैला उडालं. त्यात बाली इथले पर्यटक प्रवासीही होते, ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ संशोधक आणि प्रवासी असलेलं हे विमान जेव्हा यूक्रेन-रशिया बॉर्डरवर पोहोचलं तेव्हा अचानक आलेल्या मिसाइलनं विमानाचा बळी घेतला. चार महिन्यांनंतरही या घटनेबद्दल ब्लेम गेम सुरू राहिला आणि ढिगाऱ्यातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न... 

 

Year Ender Title: 
नायजेरियातील बोको हराम: आपल्या मुली परत आणण्यासाठी
Image: 
Caption: 

नायजेरियातील बोको हराम: आपल्या मुली परत आणण्यासाठी

नायजेरियातील चिबॉक इथं आपण शाळेचे गार्ड्स आहोत म्हणून शाळेत प्रवेश त्यांनी केला आणि कोणी काही विचारायच्या आतच बंदुकीच्या धाकावर शाळेवर ताबा मिळवला. नायजेरियात संपूर्ण इस्लामीकरण करण्यासाठी बोको हराम या दहशतवादी संघटनेनं 500 विद्यार्थिनींना ओलिस ठेवलं. काही विद्यार्थिंनीना सोडवण्यास नायजेरिन सरकारला यश आलं. मात्र अनेक आई-वडील आजही आपल्या मुलींची वाट पाहत आहे. 

 

 

Year Ender Title: 
हाँगकाँग - लोकशाही याचना
Image: 
Caption: 

हाँगकाँग - लोकशाही याचना

हाँगकाँगमध्ये 'त्यानआनमेन चौक' सप्टेंबरमध्ये बनवण्यात आला. विद्यार्थी आणि इतर समूह इथं जमायचे आणि लोकशाहीची याचना करण्यासाठी रडायचे. चीनची स्थायी समिती आणि नॅशनल पिपल्स काँग्रेस (NPCSC)च्या निवडणूक निर्णयाच्या विरोधात ही लढाई होती. 'छत्र क्रांती', 'मध्य व्यापू' या चळवळींना अनेक चेहरे आणि शक्ती मिळाली. पण प्रदर्शनकर्त्यांचा संकल्प  चीनच्या शक्तीसमोर अपर्याप्त ठरले. पोलिसांनी प्रदर्शकर्त्यांना तिथून बाहेर काढण्यास सुरूवात केली. 

 

Year Ender Title: 
तुर्की बनलं मृत्यूची खाण
Image: 
Caption: 

तुर्की बनलं मृत्यूची खाण

तुर्कीच्या सोमा, मनिसा इथं मे महिन्यात 300 कामगारांचा कोळसा खाणीत मृत्यू झाला. खाणीमध्ये आग लागल्यानं ही दुर्घटना घडली. आगीनं दोन किलोमीटर परिसर आपल्या विळख्यात घेतला. कामगारांची जगण्याची खूप कमी संधी होती. 

 

Year Ender Title: 
गाझा युद्ध - आणखी एक वर्ष, दुसरं युद्ध
Image: 
Caption: 

गाझा युद्ध - आणखी एक वर्ष, दुसरं युद्ध

हमासच्या मुलांना मृत्यू दंडाच्या शिक्षा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा 7 जुलै रोजी युद्ध सुरू झालं. त्यांच्या ताब्यातील प्रदेश हस्तगत करण्यासाठी त्यांनी मिसाइल सोडले, इस्राइलनं हवेत प्रत्युत्तर दिलं, जमीनीवरही युद्ध सुरू झालं. 50 दिवसांनंतर 2,200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली, त्यात सर्वाधिक पॅलेस्टाइनची होती. 

 

Year Ender Title: 
अमेरिका-चीन हवामानबदलाविरुद्ध एकत्र
Image: 
Caption: 

अमेरिका-चीन हवामानबदलाविरुद्ध एकत्र

हवामानबदलाविरुद्ध चीन आणि अमेरिका एकत्र आले असून त्यांनी महत्त्वाचा करार केला. 2030 पर्यंतच्या उत्सर्जन वाढीला लिमीट देण्यासंदर्भात त्यांची सहमती झाली. 

 

English Title: 
The Rise of the Islamic State