मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?

Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 8, 2024, 05:41 PM IST
मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं? title=
mumbai local train updat ac local demand increased due to hot weather

Mumbai Local Train Update:  मुंबईसह संपूर्ण राज्यात तापमानात वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळं व भीषण गरमीमुळं नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी घरातून निघाल्यानंतर काही वेळ चालल्यानंतरही उकाड्याने व घामाने नागरिकांची होरपळ होत आहे. उन्हाळा वाढत चालल्याने मुंबईकरांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. सामान्य लोकलमे प्रवास करणाऱ्या नागरिकांनीही आता एसी लोकलची वाट पकडली आहे. त्यामुळंच एसी लोकलच्या तिकिट विक्रीत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एसी लोकलच्या तिकिटांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाला आहे. 6 मे रोजी एका दिवसात 32,016 तिकिटांची विक्री झाली आहे. एका दिवसांत विक्री झालेल्या या तिकिटांची संख्या विक्रमी आहेत. 6 मे रोजी एसी लोकलसाठी 3737 प्रवाशांनी सिझन तिकिट खरेदी केले आहेत. तर, 28,279 प्रवाशांनी रेग्युलर तिकिट घेऊन एसी लोकलमधून प्रवास केला आहे. मध्य रेल्वेवर 18,932 एसी लोकलसाठी तिकिटांची विक्री झाली आहे. 

पश्चिम रेल्वेवर 8 डब्यांच्या एसी लोकलच्या 96 फेऱ्या चालवल्या जातात. तर, मध्य रेल्वेवर 6 डब्यांच्या 66 फेऱ्या चालवल्या जातात. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उकाड्यात वाढ होत असताना एसी लोकलमुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची संख्या वाढवण्यात येत आहे. आरामदायक प्रवासासाठी 3 मे रोजी सर्वाधिक तिकिटविक्री झाली होती. 30,810 इतकी एसी लोकलची तिकिट विक्री झाली होती. तर, तीन दिवसांताच यापेक्षा अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे. हा आकडा 32 हजारांच्यावर गेला आहे. लोकल ट्रेनच्या प्रवासादरम्यान उकाड्यापासून सुटका व्हावी म्हणून नियमित पासधारकांनाही एसी लोकलचे तिकिट काढले आहे. 

एसी लोकलचे रेग्युलर तिकिट स्वस्त झाल्यानंतर आता एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. सुट्ट्यांच्या दिवसांत लोक फिरण्यासाठी बाहेर निघतात. अशावेळी कडक उन्हात प्रवास करण्याऐवजी एसी लोकलला प्राधान्य देत आहेत. येत्या काही दिवसांत एसी लोकलची मागणी वाढेल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाला आहे. 

उकाड्याने नागरिक हैराण

यंदा मुंबईत पारा चढला आहे. एप्रिल महिन्यातच दोनदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला आणि पाराही जवळपास 40 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. मेच्या मागील 6 दिवसांत पारा 33 ते 34 डिग्री सेल्सियसपर्यंत होता. एप्रिलच्या तुलनेत या महिन्यात तापमानात थोडी घट झाली आहे.