महिलांना वजन कमी करणं कठीण का असतं ?

पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजन कमी करण्साठी खूप मेहनत घ्यावी लागते.

May 17, 2024, 20:00 PM IST

वजन कमी करण्यासाठी डाएट, जीम आणि योगासनं केली जातात. मात्र सगळं करुन ही हवं तसं वजन कमी होत नाही. 

 

1/7

वजन कमी करण्यासाठी डाएट, जीम आणि योगासनं केली जातात. मात्र सगळं करुन ही हवं तसं वजन कमी होत नाही.   

2/7

शारिरीक  बदलाप्रमाणेच स्त्रिया आणि पुरुषांमधील हार्मोन्समध्ये ही तितकाच फरक असतो. त्यामुळेच वर्कआऊट करुनही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं वजन लवकर कमी होत नाही. 

3/7

हार्मोनलमधील बदल

स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शरीरातील हार्मोनलमध्ये बराच फरक असतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरात मांसपेशीचं प्रमाण अधिक असतं.त्यामुळे स्त्रियांना वजन कमी करण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त काळ लागतो.   

4/7

लठ्ठपणासंबंधित आजार

बदलती जीवनशैली आणि फास्टफूडमुळे महिलांना थायरॉइड आणि अनियमित मासिकपाळीच्या समस्या होतात. त्यामुळे झपाट्याने वजन वाढतं.  जर थायरॉइडचा त्रास होत असल्यास वजन कमी झटपट वजन कमी होत नाही.   

5/7

प्रेग्नेंसी

गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सात ते नऊ महिन्यांमध्ये आणि बाळाला जन्म दिल्यानंतर स्त्रियांचं वजन वाढलेलं असतं.   

6/7

सेक्स हार्मोन

एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन सारख्या हार्मोन्समुळे मोठ्या प्रमाणात शारिरीक बदल होत असतात. 

7/7

एस्ट्रोजन नावाचं हार्मोन्स महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येते. हे हार्मोन्स शरीरात असंतुलित झाल्याने लठ्ठपणा झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते.  (येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)