अभिनेत्री पायल घोषचा वादांशी बऱ्याच वेळापासून संबंध आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे आणि तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.

पायलला युजर्सना केव्हा आणि कसे आकर्षित करायचे हे चांगलेच माहीत आहे. तिची स्पष्टवक्ते शैली आणि कृत्ये यामुळे ती अनेकदा नेटिझन्सच्या डोळ्यावर येत असते. मात्र याचा तिला काहीच फरक पडत नाही.

पायल घोषने शमीचे नाव घेऊन एक स्फोटक मेसेज पोस्ट केला होता., 'शमी, तू तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे, असे पायल घोषने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

टीम इंडियाचे वर्ल्ड कप 2023 जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. या पराभवामुळे क्रिकेटपटू आणि चाहते दोघेही नाराज आहेत. अभिनेत्री पायल घोष हिचेही मन दुखावले आहे.

भारताच्या पराभवानंतर अभिनेत्रीने क्रिकेट सामने पाहण्याचे सोडले आहे. तिने 6 महिने क्रिकेट न पाहण्याची घोषणा केली आहे. पुढील 6 महिने माझ्यासाठी क्रिकेट नाही, असे पायलने म्हटलं.

पायल घोषने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तिला इंडस्ट्रीत यश मिळवता आले नाही. पायल घोषने मी टू अंतर्गत दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अनेक गंभीर आरोप केले होते.

पायल घोषने अभिनय सोडून राजकारणातही प्रवेश केला. तिने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. पायल आता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

VIEW ALL

Read Next Story