'द व्हॅक्सिन वॉर'

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात ते डॉक्टर भार्गवच्या भूमिकेत दिसणार आहेत.

"खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचयला हव्यात"

दरम्यान, नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत सत्य घटनांवर आधारित चित्रपटांवर भाष्य केलं. या चित्रपटातून खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचयला हव्यात असं ते म्हणाले आहेत.

"तथ्यांमध्ये बदल करु शकत नाही"

"जेव्हा तुम्ही हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे असं सांगता, तेव्हा आपण त्यांना काही प्रश्न विचारु शकतो. कारण ते तथ्यांमध्ये बदल करु शकत नाहीत," असं नाना पाटेकर म्हणाले.

"भन्साळींच्या चित्रपटात पाहू शकता"

जर ती सत्य गोष्ट असेल तर त्यात सर्व काही सत्यच असलं पाहिजे. तुम्ही भन्साळींच्या चित्रपटात हे पाहू शकता असं नाना पाटेकर यांनी सांगितलं.

मल्हारी गाणं ऐकून नाराज

नाना पाटेकरांनी सांगितलं की, संजय लिला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील मल्हारी गाणं ऐकून ते नाराज झाले होते. यासाठी त्यांनी थेट फोनही लावला होता.

भन्साळींना फोन करुन विचारला जाब

"मी मल्हारी गाणं ऐकल्यानंतर नाराज होतो. मी सरळ भन्साळींना फोन केला आणि विचारलं हे वाट लावली काय असतं?," अशी माहिती नाना पाटेकरांनी दिली.

"मला नाही आवडलं"

लोकांना हे आवडलं की नाही याचा मला फरक पडत नाही. मला नाही आवडलं तर मी थेट सांगतो असं नाना पाटेकर म्हणाले.

'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित

दरम्यान, नाना पाटेकर यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अनिल शर्मा यांचा चित्रपट 'जर्नी'मध्ये ही दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story