तहान लागतेय?

तुम्हालाही वारंवार तहान लागतेय? सावध व्हा! ही सवय असू शकते 'या' आजारांचे संकेत

पाण्याची कमतरता

वारंवार तहान लागणं, शरीरारीत पाण्याच्या पातळीत असणाऱ्या कमतरतेकडे खुणावतं. यालाच डिहायड्रेशन असंही म्हणतात.

डिहायड्रेशन

डिहायड्रेशनची समस्या सतावणाऱ्यांना चक्कर येणं, सततची डोकेदुखी, उलटीसारखं वाटणं, किंवा उलटी येणं, अतिसार आणि अशक्तपणा अशी लक्षणं जाणवतात.

मधुमेह

मधुमेहाच्या प्राथमिक स्तरावर तो अनेकांच्याच लक्षात येत नाही. पण, तुम्हाला प्रमाणाहून जास्त तहान लागत असल्यास हे मधुमेहाचे संकेतही असू शकतात हे लक्षात घ्या.

एकसारखी तहान

जेव्हा आपलं शरीर द्रव्यपदार्थांमध्ये समतोल राखण्यास असमर्थ ठरते तेव्हा ही परिस्थिती उदभवू शकते. त्यामुळं एकसारखी तहान लागत असल्यास मधुमेहाची रक्तचाचणी करून घ्या.

तोंड कोरडं पडण्यास सुरुवात

तोंड कोरडं पडण्यास सुरुवात होते तेव्हाही अनेकदा वारंवार तहान लागते. ज्यावेळी तोंडातील लाळग्रंथी पुरेशा प्रमाणात लाळेची निर्मिती करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा ही परिस्थिती उदभवते.

Dry Mouth

Dry Mouth असल्यास तोंडाचा संसर्ग, दुर्गंधी येणं अशा समस्यांचा सामना त्या व्यक्तीला करावा लागू शकतो.

लाल रक्तपेशी

शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता जाणवल्यास व्यक्तीला अॅनिमीयाचा धोका असतो. सर्वसाधारण भाषेत सांगावं तर, शरीरात रक्ताची कमतरतात.

हे बदल समजून घ्या

जेव्हा शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असतं. तेव्हा तहान लागण्याचं प्रमाण प्रचंड वाढतं. त्यामुळं शरीरात होणारे हे बदल समजून घ्या.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि मथळ्यांच्या आधारे घेण्यात आली असून, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

VIEW ALL

Read Next Story