दर दिवशी किती अंडी खावीत?

एका दिवसात किती अंडी खाणं फायद्याचं? पाहा आणि चुका टाळा

पोषक तत्त्वं

अंड्याच्या सेवनामुळं प्रोटीन, फोलेट, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यांसारखे अनेक पोषक तत्व मिळतात.

अंड कितीही फायद्याचं ?

अंड कितीही फायद्याचं असलं तरीही त्याचं प्रमाणात सेवन होणंही तितकंच गरजेचं. तुम्हाला माहितीयेत का एका दिवसात किती अंडी खाणं योग्य?

अंड्यांचं सेवन

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंड्यांचं सेवन हे तुमच्या शारीरिक गरजा आणि हालचालींवर अवलंबून असतं.

सॅच्युरेटेड फॅट

अंड्याच्या पिवळ्या भागात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल असते, ज्यामुळे हृदयविकार वाढू शकतात. परिणामी हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी रोज एक अंड्याचे सेवन करावे.

185 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल

एका अंड्यामध्ये सुमारे 185 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते आणि हृदयरोग टाळण्यासाठी, तुम्हाला दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल मिळायला हवे.

अंडी पूर्णपणे शिजवली पाहिजेत

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडी पूर्णपणे शिजवली पाहिजेत. कारण, कमी शिजवलेल्या अंड्यामुळे संसर्ग होऊ शकतो.

अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते.

अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खावा. अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न टाळले जाते. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेतली असून, कोणत्याही निर्णयात तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story