तणाव-डिप्रेशनचा धोका

आता पावसाळा सुरु होईल अशा परिस्थिती अनेक जण गरम बटाटे वडे, समोसे किंवा भजी खातात पण बर्‍याच अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, फ्रेंच फ्राईज यांसारख्या डीप फ्राईड गोष्टी खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो.

शरीरावर वाईट परिणाम

तुम्हालाही फ्रेंच फ्राईज समोसा खायला आवडते का? जर तुमचे उत्तर हो असेल तर सावध होण्याची गरज आहे. कारण तुमची ही सवय तुमच्या शरीरावर वाईट परिणाम करू शकते.

तळलेल्या गोष्टी गंभीर

संशोधकांचे मत आहे की, बटाटे, समोसे किंवा पकोड्यांपासून बनवलेल्या फ्रेंच फ्राईजसारख्या तळलेल्या गोष्टी खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो. बर्‍याच अभ्यासांमध्ये, तळलेल्या गोष्टी गंभीर मानसिक परिस्थितीशी जोडल्या गेल्या आहेत.

चुकूनही तळलेले पदार्थ खाऊ नका

तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळले पाहिजे. एका संशोधनानुसार तळलेले पदार्थ खाल्ल्याने तणावसारख्या समस्यांचा धोका 12 टक्के आणि नैराश्याचा धोका 7 टक्के आढळले.

तळलेले पदार्ष वाईट का असतात?

तळलेल्या वस्तूंमध्ये ऍक्रिलामाइड रसायन आढळून आल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. उच्च तापमानात कोणतीही गोष्ट शिजवली की एक रसायन बाहेर पडते.

मेंदूची जळज

अभ्यासात असे आढळून आले आहे की कालांतराने ऍक्रिलामाइड मेंदूची जळजळ वाढवते. त्यामुळे वागण्यात बदल होतो आणि अनेक प्रकारच्या समस्याही येतात.

अशा गोष्टींचा वापर कमी

संशोधकांना असे आढळून आले की, जेव्हा बटाटे आणि इतर गोष्टी अधिक कुरकुरीत आणि तपकिरी केल्या जातात तेव्हा ऍक्रिलामाइड तयार होते. हे भाजलेल्या कॉफी बीन्समध्ये आढळते. म्हणूनच अशा गोष्टींचा वापर कमी केला पाहिजे.

तळलेल्या पदार्थांपासून लांब राहा

नाश्त्यामध्ये कधीही तेलकट, तिखट चिकन खाऊ नये. चिकनमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनचा समावेश आहे. पण या सर्व गोष्टी चिकन तयार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. नाश्त्यामध्ये तर तळलेले चिकन अजिबात खाऊ नका.

संशोधकांचे काय म्हणणे

संशोधकांच्या मते, ऍक्रिलामाइड न्यूरोटॉक्सिन म्हणून कार्य करते आणि मेंदूच्या कोणत्याही भागात ऑक्सिडेटिव्ह आणि दाहक नुकसान होऊ शकते.

जास्त तळलेल्या गोष्टी खाल्ल्याने...

काही संशोधने असेही सुचवतात की ऍक्रिलामाइडमध्ये आणि मज्जासंस्थेमध्ये न्यूरोडिजनरेशन आणि न्यूरोट्रांसमिशन समस्या वाढते. जास्त तळलेल्या गोष्टी खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढतो, असे अभ्यासात आढळून आले आहे.

VIEW ALL

Read Next Story