सतत सर्दी का होते ? 'या' घरगुती उपायांमुळे झटक्यात मिळेल आराम

पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला होण्याचं प्रमाण जास्त असतं, मात्र काही जणांना बाराही महिने सर्दीचा त्रास होतो, त्यामुळे जाणून घेऊया सतत सर्दी होण्याची कारणं काय आहेत.

धुळीची अ‍ॅलर्जी

थंड पदार्थ खाल्ल्याने सर्दी होते असं असलं तरी अनेकांना धुळीची अ‍ॅलर्जी असल्याने बारा ही महिने सर्दीचा त्रास होतो.

अपुरी झोप

सतत होणारी सर्दी हे झोप पूर्ण न होण्याचं लक्षण आहे. त्यामुळे पुरेशी झोप होत नसल्यास सतत सर्दीचा त्रास होत असतो.

बदलतं वातावरण

वाढत्या प्रदूषणामुळे ऋुतूचक्र बदलत आहेत. त्यामुळे याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो. सतत सर्दी होणं हे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असण्याच लक्षण आहे.

सतत सर्दी होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी रोज एक ग्लास गरम पाणी प्यावं.

कापूर तेल

निलगिरी किंवा कापूर तेलाचे थेंब गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने वारंवार होणाऱ्या सर्दीवर आराम मिळतो.

गुळ

गुळ उष्णवर्धक असल्याने कफाचा त्रास दूर होतो. रोज एक गुळाचा खडा खाल्ल्याने सर्दीचा त्रास होत नाही. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story