इतक्या प्रदूषणातही मुलांना शाळेत पाठवताय का? मग या' 6 गोष्टी नक्की करा, अन्यथा...

मुंबईसह दिल्लीतही प्रदूषणाची पातळी वाढली आहे. दिल्लीत तर हवेची गुणवत्ता दिवसाला 50 सिगारेट जाळल्याइतकी खराब झाली आहे.

अशा स्थितीत शाळकरी मुलांना या स्थितीत घराबाहेर कसं पाठवायचं असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.

मुलांना विनामास्क शाळेत पाठवू नका. मुलांना शक्यतो 95 मास्क द्या जेणेकरुन धूळ, बॅक्टेरिया, व्हायरस यापासून बचाव होईल.

मुलांना वर्गातून जास्त बाहेर आणणार आहेत याची काळजी घ्या. तसंच शाळेतही मास्क काढले जाणार नाहीत याची काळजी घ्या.

डॉक्टरांनुसार, मुलांना जास्तीत जास्त पाणी पाजा. यामुळे शरिरातील घातक घटक बाहेर पडतील.

अशा स्थितीत मुलांना बाहेरचं जेवायला देऊ नका. त्यांना घरातच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं अन्न द्या.

जर तुमच्या मुलाला अस्थमा किंवा श्वसनाचा आजार असेल तर एअर प्युरिफायरचा वापर करु शकता. यामुळे हवा शुद्ध होते.

VIEW ALL

Read Next Story