मिर्झापुरमधील अँटिलिया चर्चेत

मिर्झापुरचे डॉ. सियाराम पटेल यांनी अँटिलियासारखे 14 मजली घर बांधून चर्चेत आले आहेत.

1200 चौरस फूटात बांधली इमारत

डॉ. सियाराम पटेल यांनी ही 14 मजली गगनचुंबी इमारत केवळ 1200 चौरस फूट जागेवर बांधली आहे. डॉक्टरांना रॉयल्टीची आवड असून त्यांनी ही इमारत त्यांच्या श्रुतिहार गावात बांधली आहे.

काम झालं बंद

डॉ. सियाराम पटेल यांनी बघता बघता 14 मजली इमारत बांधल्याने गावात एकच खबळबळ उडाली होती. स्थानिकांच्या तक्रारीनंतर या इमारतीचे काम बंद करण्यात आले आहे.

20 वर्षांपासून सुरु होते काम

सुमारे दोन दशकांपूर्वी या इमारतीचे काम सुरू करण्यात आले आणि वर्षानुवर्षे तिची उंची वाढतच गेली. त्यामुळे नागिरकांनी यासंदर्भात तक्रार केली होती.

राजासारखं जगतात सियाराम पटेल

डॉ. सियाराम पटेल यांच्याबद्दल सांगितले जाते की, त्यांना राजासारखे छंद आहेत. म्हणूनच त्यांनी ही इमारत बांधली आहे. एवढेच नाही तर डॉक्टरने एक-दोन नव्हे तर चारवेळा लग्न केले आहे.

इमारत पूर्णपणे बंद

कायदेशीर वादामुळे ही इमारत गेल्या दहा वर्षांपासून बंद आहे. स्थानिक सांगतात की, सियाराम पटेल यांच्या तिसऱ्या पत्नीची मुले पोटगीसाठी न्यायालयात गेली होती. तेव्हापासून इमारत पूर्णपणे बंद आहे.

इमारत पाडण्याची मागणी

ही इमारत जीर्ण झाली असून तिची उंची जास्त असल्याने ही इमारत केव्हाही कोसळण्याची भीती आता या इमारतीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.

VIEW ALL

Read Next Story