लक्षद्वीपची पर्यटन स्थळं कोणती? 'या' 4 ठिकाणांना नक्की भेट द्या!

भेट देण्याची योग्य वेळ कोणती?

भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेले लक्षद्वीप हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय अद्भुत ठिकाण आहे. ऑक्टोबर ते मार्चमध्ये तुम्ही लक्षद्विपला भेट देऊ शकता.

कोणत्या ठिकाणांना भेट द्याल?

संस्कृती, परंपरा, जीवनशैली आणि खाद्यपदार्थ यांचे मिश्रण असलेल्या लक्षद्विपला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी. कोणत्या ठिकाणांना भेट द्यावी? पाहुया...

मिनिकॉय

मिनिकॉय हे लक्षद्वीपचे एक सुंदर बेट आहे जिथे तुम्ही खूप मजा करता येईल. मंद सूर्यप्रकाशात तुम्ही इथल्या समुद्रकिनाऱ्यावर बसाल तेव्हा समुद्राची दृश्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. कँडल लाईट डिनरचा अनुभव तुम्हाला सुन्न करेल.

काल्पेनी बेट

स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, बोटिंग, कॅनोइंग यांसारख्या साहसी क्रियाकलापांचा आनंद घेयचा असेल तर तुम्ही काल्पेनी बेटाला भेट देणं गरजेचं आहे. हे बेट वॉटर स्पोर्ट्ससाठी ओळखलं जातं.

कावारत्ती बेट

लक्षद्विपची राजधानी असलेल्या कावरत्ती या समुद्रातील बेटावर तुम्हाला पांढर्‍या वाळूसह दूरवर पसरलेली सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. नारळाची सुंदर झाडं तुम्हाला पहायला मिळतील.

कदमत बेट

सूर्योदय आणि सूर्यास्ताची दृश्य पहायची असतील तर तुम्ही कदमत बेटाला नक्की भेट द्यायला हवी. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवायचा असेल, तर हे ठिकाण तुम्हाला आनंद देईल.

VIEW ALL

Read Next Story