स्वामी विवेकानंदांचे 10 विचार, तुमचे आयुष्य बदलून टाकतील

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. त्यांचे लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते.

जीवनात हताश किंवा निराश झालात तर स्वामी विवेकानंद यांचे विचार नक्की वाचा.

उठा, जागृत व्हा आणि आपले लक्ष्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका.

तुम्हाला कोणी शिकवू अथवा अध्यात्मिक बनवू शकत नाही. स्वत:लाच शिकावे लागले. आत्मा हा सर्वोत्तम शिक्षक आहे.

सत्य अनेक पद्धतीने सांगता येते. पण सत्य हे सत्यच राहते.

मन आणि बुद्धीमध्ये द्वंद्व होत असेल तर सत्सत विवेकबुद्धीचा मार्ग निवडा आणि पुढे जा.

तुमच्यासमोर काही अडचणी किंवा आव्हान येत नसतील तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आहात. येथे तुम्हाला यश मिळणार नाही.

संगत तुम्हाला ऊंचावर नेऊ शकते आणि ऊंचावरुन खाली पाडूदेखील शकते.

सर्वकाही गमावण्यापेक्षा वाईट उमेद गमावण आहे. जिच्यामुळे तुम्ही सर्वकाही प्राप्त करु शकता.

सुरुवातील प्रत्येक चांगल्या गोष्टीची मस्करी होते. त्यानंतर त्याला विरोध होतो. नंतर त्याला स्वीकारले जाते.

अनेक कमी असूनही आपण स्वत:वर प्रेम करतो. मग एखाद्याच्या एका चुकीमुळे आपण त्याचा द्वेश का करायचा?

VIEW ALL

Read Next Story