भारतीय बाजारपेठेत मागील काही वर्षांपासून परवडणाऱ्या एसयुव्हीला पसंती दिली जात आहे.

फ्रान्समधील प्रमुख वाहन निर्माता कंपनी Renault ने 2024 Kiger लाँच केली आहे.

आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असणाऱ्या एसयुव्हीची किंमत 5.99 लाख रुपये आहे. टॉप व्हेरियंटसाठी 11.23 लाख मोजावे लागणार आहेत.

कंपनीने या कारमध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. पण मेकॅनिझम आणि डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आलेले नाहीत.

कंपनीने या कारला चार नव्या व्हेरियंटमध्ये सादर केलं आहे. तर टर्बो पेट्रोल व्हेरियंट रेड ब्लॅक कॅलिपरमध्ये आहे.

दोन इंजिन पर्याय

Kiger दोन इंजिनच्या पर्यायात उपलब्ध आहे. यामध्ये 1.0 लीटर नॅच्यूरल एस्पिरेटेड आणि 1.0 लीटर टर्बो एस्पिरेटेड टर्बो युनिटचा समावेश आहे. नॅच्यूरल एस्पिरेटेड इंजिन 71 बीएचपी पॉवर आणि 96 एनएमचा टार्क जनरेट करतं.

तर 1.0 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन 99 बीएचपीची पॉवर आणि 160 एनएमचा टार्क जनरेट करतं.

या एसयुव्हीत 405 लीटरचा बूट स्पेस मिळतो. 205 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. तसंच 40 लीटरची इंधन टाकी आहे.

ही कार ताशी 20 किमीचा मायलेज देते.

फिचर्स

8 इंचाची टचस्क्रीन, इंफोटेनमेंट सिस्टम, 7 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पूश स्टार्ट-स्टॉप बटण, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल आणि एक PM2.5 एअर फिल्टर मिळतो.

सेफ्टी फिचर्स

सेफ्टी फिचर्समध्ये 4 एअरबॅग, एबीएससह ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, रेअर पार्किंग सेन्सर, रिअर पार्किंग कॅमेरा आणि TPMS सारखे फिचर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story