पायलटकडे असतात सारख्याच दिसणाऱ्या बॅग

विमानतळावर अनेकदा सर्वच पायलट सारख्याच दिसणाऱ्या बॅग घेऊन प्रवेश करतात आणि बाहेर पडताना दिसतात.

बँगांमध्ये असतं काय?

या बँगांमध्ये नेमकं काय असतं असा प्रश्न तुम्हीही अशा पायलटला पहिल्यावर पडला असेलच ना? याचं उत्तर एअर इंडियाने दिलं आहे.

एनी दिव्या यांच्या मदतीने दिली माहिती

एअर इंडियाने एक्स (ट्विटरवर) पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये सीनिअर कमांड एनी दिव्या यांच्या मदतीने पायलटच्या केबिन बॅगमध्ये नक्की काय असतं हे सांगितलं आहे.

बॅगेमध्ये नेमकं काय नेतात?

या व्हिडीओमध्ये एनी दिव्या आपल्या बॅगेमध्ये नेमकं काय काय नेतात हे त्यांनी दाखवलं आहे.

एअरपोर्ट आयडी

सर्वात आधी त्या बॅगमध्ये एअरपोर्ट आयडी ठेवतात. एअरपोर्टमध्ये पायलट्ससाठी विशेष प्रवेशद्वार असतं जिथे हे आयडी दाखवावं लागतं.

फ्लाईंग लायन्स

त्यानंतर फ्लाईंग लायन्स म्हणजेच विमान उडवण्याचा परवाना एनी बॅगमध्ये ठेवतात. प्रत्येक वैमानिकाकडे उड्डाण करताना हा परवाना असणं बंधनकारक असतं.

पासपोर्ट

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट. एनी यांच्या या व्हिडीओमध्ये त्या पासपोर्ट बॅगेच्या अगदी बाहेरच्या खिशात ठेवताना दिसत आहेत.

टॉर्च

वैमानिक उड्डाणाच्या वेळी आवर्जून आपल्या केबिन बॅगमध्ये जी गोष्ट घेऊन जातात ती म्हणजे टॉर्च.

आयपॅड

पायलट त्यांच्याबरोबर आयपॅडही आवर्जून घेतात. आयपॅड हा अत्यावश्यक गोष्टींपैकी एक आहे. याच आयपॅडमध्ये सर्व कागदपत्रं असतात.

रॅम्प जॅकेट

पायलट रॅम्प जॅकेटही आपल्या बॅगमध्ये ठेवतात. हे सुद्धा त्यांना अत्यावश्यक असतं.

चष्मा आणि गॉगल्सचा सेट

केबिन बॅगमध्ये पायलट अतिरिक्त चष्मा आणि गॉगल्सचा सेटही आवर्जून ठेवतात.

अनेकांनी मानले आभार

एअर इंडियाने पायलट नेमकं काय काय आपल्या बॅगेत नेतात ही माहिती दिल्याबद्दल अनेकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

VIEW ALL

Read Next Story