हुरुन इंडियाच्या 'टॉप फिलान्थ्रोपिस्ट लिस्ट 2023' नुसार, रोहिणी नीलेकणी या भारतातील सर्वात दानशूर महिला आहेत.
रोहिणी नीलकणी या इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या पत्नी आहेत. तसेच रोहिणी नीलेकणी अर्घ्यम फाउंडेशनच्या संस्थापक आणि फिलान्थ्रोपिस्ट संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
याशिवाय देशातील टॉप-10 दानशूर व्यक्तींमध्ये समाविष्ट असलेली त्या एकमेव महिला ठरल्या आहेत. 64 वर्षीय रोहिणी या यादीत 10व्या स्थानावर आहेत.
पती आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी हे देखील या यादीत 8 व्या स्थानावर आहेत. त्यांनी 189 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
रोहिणी यांच्या व्यतिरिक्त, देणगी देणाऱ्या महिलांमध्ये थरमॅक्सचे अनु आगा आणि कुटुंब, USV च्या लीना गांधी तिवारी यांचा समावेश आहे.
रोहिणी निलेकणी यांनी वर्षभरात 170 कोटी रुपयांची मोठी देणगी दिली आहे. 170 कोटींपैकी त्यांनी आपले शेअर्स विकून 163 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे.
लोकांना देणगी देताना कोणतीही भीती वाटू नये आणि अधिकाधिक लोकांनी त्यांची मालमत्ता दान करायला हवं अशी माझी इच्छा आहे, असे रोहिणी निलेकणी यांनी म्हटलं आहे.