परराष्ट्र मंत्र्यांनी दिली माहिती

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत आकडेवारी सादर केली आणि माहिती दिली की गेल्या काही वर्षांत भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

देशाबाहेर जाणाऱ्यांचा अधिक कल

2011 ते 2022 पर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की परदेशात स्थायिक होण्याकडे आणि नागरिकत्व सोडण्याकडे भारतीयांचा कल आहे.

गेल्या वर्षी केला विक्रम

गेल्या वर्षी 2022 मध्ये विक्रमी 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले होते.

गेल्या काही वर्षातील आकडेवारी?

2021 पर्यंत तब्बल 1 लाख 60 हजार लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडलं होते. तर 2011 ते 2022 पर्यंत सरासरी 138,620 भारतीयांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे.

काय कारण असू शकते?

उत्तम आर्थिक संभावना, शिक्षण, जीवनाचा दर्जा हे भारताविषयी असंतोष निर्माण करणारे मुख्य घटक असू शकतात. तसेच जागतिक गतिशीलता हे लोकांना परदेशी नागरिकत्व घेण्यास प्रवृत्त करण्याचे कारण असू शकते.

भ्रमनिरास का होतोय?

भारतीय पासपोर्ट फार शक्तिशाली नाही. हा पासपोर्ट केवळ 57 देशांना आणि आशियाई, आफ्रिकन आणि कॅरिबियन देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश देतो. याउलट, यूएस, कॅनडा, यूके आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांचे पासपोर्ट 150 हून अधिक देशांमध्ये चालतात.

भारतात दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नाही

यूकेचा नागरिक यूएस किंवा कॅनडाचा नागरिक देखील असू शकतो, कारण हे देश दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देतात. भारतात तशी स्थिती नाही.

भारतात हे शक्य आहे का?

भारतीय संविधान भारतीय नागरिक असताना परदेशी नागरिकत्व धारण करण्यास परवानगी देत ​​नाही. म्हणून एखादा परदेशी नागरिकत्व स्विकारतो तेव्हाच तो भारतीय नागरिकत्व गमावतो. त्यामुळे पासपोर्ट जमा करणे देखील बंधनकारक आहे. (सर्व फोटो - PTI)

VIEW ALL

Read Next Story