मेहंदीमध्ये मिसळा 'हे' दोन पदार्थ; चमक पाहून सगळेच विचारतील काय केलं?

क्रीम बेस्ड कलर

केस पांढरे होऊ लागले की, पार्लरमध्ये जाऊन ते क्रीम बेस्ड कलर किंवा मेहंदीनं रंगवण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात.

खर्च

पार्लरमध्ये जाणं म्हणजे खर्च आला आणि खर्चाचा विषय आला की हिशोबाची आकडेमोड सुरु झालीच म्हणून समजा.

चमक

पार्लरप्रमाणं कमाल पद्धतीनं केस रंगवून हवेत? घरच्या घरी सहजपणे मिळवता येतेय अगदी तशीच चमक. कसं? पाहा....

मिसळा हे पदार्थ

केसांना लावण्यासाठीची मेहंदी भिजवत असताना त्यामध्ये बीट आणि कॉफी पावडर मिसळावी.

पद्धत

बिटचा किस करून तो उकळत्या पाण्यात मिसळावा. यातच कॉफी मिक्स करून हे पाणी मेहंदीमध्ये ओतावं. ज्यामुळं केसांना छानसा बर्गंडी रंग येण्यासोबतच ते चमकदार होतात.

लक्षात ठेवा

कॉफी आणि बीटचा वापर मेहंदीसोबत केल्यामुळं केसांची दाटी वाढण्यासही मदत होते. त्यामुळं इथून पुढं केसांना मेहंदी लावताना ही टीप लक्षात ठेवा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. )

VIEW ALL

Read Next Story