वृंदावन सोसायटी

मुंबईजवळील ठाणे खाडीशेजारी असलेली वृंदावन सोसायटी देखील हॉन्टेड प्लेस आहे. येथील गार्ड रात्रीच्या वेळी डुलकी लागल्यास कानाखाली बसल्याचा अनुभव सांगतात. जागे झाल्यानंतर आसपास कोणीही नसते. रात्रीच्या गस्तीदरम्यान कानात कुजबूजही ऐकण्यास मिळते. या सोसायटीतील वृद्धाने येथे आत्महत्या केली होती. तेव्हपासून येथे त्याचा आत्मा भटकत असतो, असे काहींचे म्हणणे आहे.

टॉवर ऑफ सायलेन्स

मलबार हिल येथील टॉवर ऑफ सायलेन्स हे देखील एक हॉन्टेड प्लेस आहे. एक विशिष्ट समुदायतील लोकांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. येथे मृतदेह लटकवले जातात. गिधाड या मृतदेहाचे लचके तोडतात. येथे अनेक मृतदेह पहायला मिळतात. या परिसरात एक उग्र दर्प येत असतो. तसेच येथील शांत वातावरण यामुळे हे ठिकाण अत्यंत भयंकर वाटते.

पवन हंस कॉटर्स

मुंबईतील पवन हंस कॉटर्सही अशाच हॉन्टेड प्लेसमध्ये येते. काहींनी येथे एक आगीने पेटलेली मुलगी पाहिल्याचा दावा केला आहे. ही मुलगी मागे लागते, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. सलमा असे या मुलीचे नाव असल्याचा काहींचा दावा आहे. 1989 मध्ये ती आग लागून मृत्यूमुखी पडली होती. पण तिच्या आत्म्याने ही जागा अजूनही सोडली नाही. जर कोणी भुताखेतावर विश्वास ठेवत नसेल, तर त्यांनी येथे एकदा अनुभव घ्यावा.

ग्रॅण्ड पॅरेडाइ टॉवर

मुंबईतील ग्रॅण्ड पॅरेडाइ टॉवरही अशाच घटनांपैकी एक आहे. या टॉवरमधील तीन ब्लॉक्स हे भीतीदायक आहेत. पॉश असलेल्या या टॉवरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली होती. टॉवरवरून उडी मारून आपले जीवन संपावले होते. तेव्हापासून येथील ‘तो’ फ्लॅट सील आहे. येथे ‘अज्ञात शक्ती’ असून येथे गेल्यास मृत्यू अटळ, असा स्थानिकांचा दावा आहे.

मुकेश मील

कुलाबा विभागातील मुकेश मील भयानक छिकाण मानले जाते. 1975 मध्ये स्थापन झालेली, मुकेश मिल्स आगीच्या दुर्घटनेमुळे 1982 मध्ये बंद झाली. मुकेश मिल्सचे अवशेष अनेक वर्षांपासून नागरीकांना भयभित करतात. बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे येथे शूटिंग केले जाते. कलाकार आणि क्रू सदस्यांनी त्याच्या आवारात शूटिंग करताना विचित्र अनुभव आले.

मार्वे आणि मढ आयलंड रोड

मार्वे आणि मढ आयलंड रोडने प्रवास करणाऱ्या लोकांनी वधूच्या पोशाखात एक मुलगी मदत मागताना पाहिली आहे. असंतुष्ट आत्मा रस्त्यावर फिरतो आणि जाणाऱ्या वाहनांना थांबवतो, असे काही सांगतात. काही वर्षांपूर्वी एका मुलीला तिच्या लग्नाच्या रात्री क्रूरपणे मारून शेजारील खारफुटीच्या जंगलात फेकून दिले होते. तेव्हापासून, लोकांनी येथे त्या मुलीला पाहिले असल्याचा दावा केला आहे.

डीसुझा चाळ

माहिम येथील डी’सुझा चाळ ही हॉरर चित्रपटातील भयावह लोकेशनसारखी भासते. येथे बऱ्याच पर्यटकांनी अबनॅचरल गोष्टींचा अनुभव घेतल्याचा दावा केला आहे. दशकापूर्वी येथील विहिरत एका महिलेचा बुडून मृत्यू झाला होता. तेव्हापासून येथे अबनॅचरल गोष्टी घडल्याचा दावा काहींनी केला आहे. त्यामुळे रात्रीचे घराबाहेर न पडणेच येथील रहिवासी पसंत करतात.

नॅशनल पार्क

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यी-प्राणी प्रेमींसह बच्चेकंपनीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, येथे सूर्यास्तानंतर येथे ‘लेडी घोस्ट’ फिरते. तुम्ही नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी गेला आहात आणि बाहेर पडताना उशीर झाला आणि सूर्यास्त झाला असेल, तर अज्ञात महिलेला चुकूनही लिफ्ट देऊन नका. ही लेडी घोस्ट तुमच्या वाहनासमोर येईल आणि तुम्हाला थांबविण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही थांबला नाही तर तुम्हाला घाबरविण्याचाही प्रयत्न करेल. पण, तुम्ही न भीता वाहन चालवत बाहेर पडा.

सेंट जोन चर्च

1579 मध्ये बांधकाम केलेले अंधेरी पूर्व येथील सेंट जॉन्स बाप्तिस चर्चमध्येही अशाच काहीशा कहाण्या प्रसिद्ध आहेत. येथे साथरोग पसरल्यामुळे 1840 पासून हे चर्च बंद आहे. 1977 मध्ये येथे एका दुष्ट आत्म्याला दूर ठेवण्यासाठी भूतबाधा करण्यात आली होती. पुजारी प्रक्रिया करत असताना तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी किंचाळणे, हशा आणि रडणे ऐकले आणि चर्चच्या तलावातील मोठ्या आवाजाने सर्व मासे मारले गेल्याचे दस्तऐवजीकरण आहे. त्या दिवसापासून, कोणीही त्याच्या उपस्थितीची कोणतीही घटना नोंदवली नाही.

आरे कॉलनी

तुम्ही आरे कॉलनीत फिरत असाल तर तेथे एक लहान मुलाला घेतलेली महिला तुम्हाला लिफ्ट मागताना दिसेल. काही वेळाने ही महिला गायबही होते. ही घटना कित्येक जणांसोबत घडल्याचे अनेकांनी दावा केला आहे. एवढेच काही येथील स्थानिकांनाही याचा अनुभव आहे. आरे कॉलनीत अशा अनेक भयावह कथा ऐकण्यास मिळतात.

इथे जाताना पाय थरथरतात

मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत, जेथे भूतप्रेतांचे वास्तव्य असल्याची चर्चा आहे. इथे जाताना पाय थरथरतात.

VIEW ALL

Read Next Story