मुंबईतील 'या' स्टेशनवर 22 दिवसांसाठी ब्लॉक

लोकल ट्रेनही बंद

मुंबईकरांनी आजपासून पुढील 22 दिवस घराबाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक पाहून पडता.

मुंबईतील हार्बर लाइनच्या प्रवाशांसाठी लोकल संदर्भात मोठी अपडेट आहे.

पनवेल स्थानकावर गाड्या रद्द होणार असल्याने प्रवाशांना 22 दिवस समस्यांना सामोरे जावं लागणार आहे.

दररोज रात्री सुमारे 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल रात्री 10.58 वाजता असेल. त्यानंतर पनवेलच्या गाड्यांना बेलापूरलाच थांबा देण्यात येणार आहे.

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.अजून 30 टक्के काम बाकी आहे.

सकाळी 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत काही लोकल सेवा रद्द राहतील.

सीएसएमटी ते पनवेल ही लोकल बेलापूरपर्यंत 23:30, 23:52, 00:13 आणि 00:40 वाजता धावेल. ठाणे ते पनवेल डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील शेवटची लोकल 23:32 वाजता असेल.

VIEW ALL

Read Next Story