फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठीच नव्हे! तुरटीचा असाही उपयोग करून बघा

फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठी नाही तुरटीचे आरोग्यासही अनेक फायदे होतात.

त्याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्या आणि पैशांची चणचणपासून मुक्ती मिळवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात तुरटीबद्दल काही उपाय सांगितले आहेत.

सतत कष्ट, मेहनत करूनही पैसा मिळत नसेल तर एक छोटा तुरटीचा तुकडा तुमच्या तिजोरीत ठेवा. याशिवाय तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.

व्यवसायात तोटा किंवा घरात सतत कुठला ना कुठला त्रास होत असेल तर काळ्या कपड्यात तुरटी बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत मिळते.

कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावून पानाला धाग्याने बांधून बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. हा उपाय तुम्ही सलग तीन बुधवारी करावा.

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवा. हा उपाय केल्यास नकारात्मक उर्जा नाहीशी होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story