मंदिरामध्ये नारळ का फोडतात?

प्राचीन अंबरनाथ शिवमंदिरात नारळ फोडायला बंदी घालण्यात आली आहे. शिव मंदिराच्या शिल्पांची झिज होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंदू धर्मात मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर काय करावं हे सांगण्यात आलं आहे. मंदिरात गेल्यावर आपण नारळ फोडतो, यामागेही एक आख्यायिका सांगण्यात आली आहे.

भगवान विष्णू पृथ्वीवर महालक्ष्मी, कामधेनू आणि कल्पवृक्ष म्हणजेच नारळ आले होते.

नारळाच्या झाडावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असं मानलं जातं.

नारळावरचे तीन डोळे हे भगवान शंकर यांचं प्रतिक आहे, अशी श्रद्धा आहे.

पूर्वी मंदिरात नरबळी दिला जात होता. या प्रथेला आळा घालण्यासाठी आणि निष्पाप प्राण्यांचा बळी देण्याऐवजी बलिदानाचा भाव म्हणून नारळ फोडण्याची प्रथा आली.

यामागे अजून एक महत्त्वाच कारण आहे. त्यानुसार मनातील ईर्ष्या दूर करण्यासाठी नारळ फोडले जाते.

असं म्हणतात की, नारळ फोडल्यामुळे नकारात्मक प्रवृत्तीचा नाश होतो आणि आपल्यामध्ये सकारात्मक भाव निर्माण होतो.

पूर्वपार चालत आलेल्या गोष्टींमागे काही ना काही कारणं असतात, ती समजल्यावर त्या प्रथा पाळण्यात आपल्याला मुळीच त्या चुकीच्या वाटणार नाहीत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story