दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत आणि यंदा लक्ष्मीपूजन हे १२ नोव्हेंबरला रविवारी आहे.

या खास दिवसाची तयारी तुम्ही आत्तापासूनच करायला हवी जेणेकरून तुम्हाला दिवाळीत सविस्तर साजरी करायला भेटेल.

दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी कोणकोणत्या विशेष वस्तू आणायला लागतात ते आज जाणून घेऊया.

लक्ष्मी मातेला काय अर्पण करावे :

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला काही वस्तू अर्पण करून विशेष आशीर्वाद मिळू शकतात

कमळाचे फूल :

माता लक्ष्मीला कमळाचे फूल खूप आवडते म्हणून कमळ अर्पण केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते.

अष्टगंध :

लक्ष्मी मातेला अष्टगंध तिलक लावा. यामुळे घरात सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो.

बत्ताशे :

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला बत्ताशा अवश्य अर्पण करा. हे संपत्ती आणि धान्याचे प्रतीक आहे.

सुपारीचे पान :

माता लक्ष्मीला सुपारीचे पान खूप आवडते. पूजेनंतर देवीला गोड पान अर्पण करणे हे शुभ मानले जाते

लाल फूल :

लक्ष्मीला लाल फुले खूप आवडतात. पूजेच्या वेळी लाल फुले अर्पण केल्याने लक्ष्मी माताची कृपा प्राप्त होते.

VIEW ALL

Read Next Story