स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात देवी-देवतांचे दर्शन होणे हे एक विशेष लक्षण आहे.

प्रभु श्रीराम

तुमच्या स्वप्नात भगवान राम दिसणे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच काही मोठे यश मिळणार आहे.तसेच याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगतीच्या संधी मिळतील.

माता दुर्गा

जर तुम्हाला स्वप्नात दुर्गा माता रागावलेली दिसली तर, तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार असल्याचे ते संकेत आहेत.

माता लक्ष्मी

जर एखाद्याला स्वप्नात माता लक्ष्मी दिसली तर ते एक शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचे भाग्य लवकरच बदलणार आहे.

शिवलिंग

स्वप्नात शिवलिंग पाहणे खूप शुभ आहे याचा अर्थ तुमच्यावरील सर्व संकटे दूर होणार आहेत.

भगवान विष्णू

स्वप्नात भगवान विष्णू दिसल्यास संबंधित व्यक्ती भाग्यवान ठरते.यश आणि प्रगतीचे मार्ग त्या व्यक्तीसाठी खुले होतात.

माता सरस्वती

माता सरस्वतीला विद्येची देवता असं म्हणतात. स्वप्नात माता सरस्वती दिसल्यास शिक्षणात यश मिळते आणि ती व्यक्ती ज्ञानाच्या जोरावर नाव कमावते.

हनुमान

हनुमान देवता स्वप्नात दिसल्याने शत्रूंवर विजय मिळेल आणि संकटेही दूर होतील. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी 24 तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story