'या' 5 गोष्टी लगेच घराबाहेर काढा

वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की, काही गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक नुकसान तर होतंच, पण घरात पैसा येण्यात अडथळे निर्माण होतात.

नकारात्मक ऊर्जा

पण अजाणतेने आपण घरात अशा गोष्टी ठेवतो ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. तसंच घरातील लोकांसमोरही समस्या उभ्या राहतात.

या पाच गोष्टी कोणत्या?

या अशा पाच गोष्टी कोणत्या आहेत, ज्या आपल्या अडचणींसाठी कारणीभूत असतात हे जाणून घ्या.

लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नीट ठेवा

देवी ही धनलक्ष्मी आहे. तिच्या कृपेने व्यक्तीला धनप्राप्ती होते. पण अनेकदा लोक लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवताना चूक करतात, ज्यामुळे वास्तूदोष निर्माण होतो.

देवतांची मूर्ती समोरासमोर ठेवू नये

वास्तूनुसार, कोणत्याही देवी-देवतांची मूर्ती समोरासमोर ठेवू नये. जर तुमच्या घरात लक्ष्मीच्या दोन मूर्ती असतील तर त्या समोरासमोर ठेवू नका. कारण यामुळे पैसा येण्यात अडथळा निर्माण होतो. तसंच खर्च वाढतो.

तुटलेल्या, निरुपयोगी गोष्टी

खराब आणि निरुपयोगी गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरात जर तुटलेल्या, निरुपयोगी गोष्टी असतील तर त्या तात्काळ बाहेर काढा.

काटे असणारी रोपं

वास्तूविज्ञानानुसार, काटे असणारी रोपं घरात ठेवू नयेत. यामुळे घरातील लोकांमध्ये भांडणं होतात.

देवाची तुटलेली मूर्ती

वास्तूविज्ञानानुसार, घरात देवाची तुटलेली मूर्ती चुकूनही ठेवू नका. घरात तुटलेली मूर्ती ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू लागते.

बंद आणि खराब घड्याळ

बंद आणि खराब झालेलं घड्याळ नकारात्मक ऊर्जा वाढवतं. जर घड्याळ बंद पडलं असेल तर ते दुरुस्त करुन घ्या, पण जर खराब झालं असेल तर फेकून द्या.

VIEW ALL

Read Next Story