एशिया कप स्पर्धेत अनेक विक्रम रचेल जाण्याची शक्यता आहे. यातला एक विक्रम मोडण्याची संधी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला आहे.

एशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीला खुणावतोय. सध्या हा विक्रम श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याच्या नावावर आहे. त्याच्या नावावार 1220 धावा जमा आहेत.

एशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक लंकेच्याच कुमार संगकाराच्या नावावर आहे. संगकाराने 1075 धावा केल्या आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने एशिया कप स्पर्धेत 971 धावा केल्या आहेत.

या यादीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचाही नंबर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 745 धावा केल्या आहेत.

तर विराट कोहलीच्या नावावर एशिया कप स्पर्धेत 613 धावा जमा आहेत. म्हणजे 358 धावा केल्यास विराट कोहलीला सचिन तेंडुलकरला मागे टाकता येणार आहे.

तर सनथ जयसुर्याचा एशिया कपमधला सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहीलला तब्बल 607 धावा कराव्या लागणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story