विश्वचषक स्पर्धेतील महामुकाबला शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. या सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही सज्ज झालीय.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडिअमला छावणीचं रुप येणार आहे. गुजरात पोलीस दलातील 6 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय NSG, RAF, NDRF चे जवानही स्टेडिअममध्ये तैनात असतील.

स्टेडिअममध्ये प्रेक्षकांची सुरक्षा, पार्किंगची व्यवस्था, क्रिकेट संघांची सुरक्षा यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये साठी सुरक्षायंत्रणा सज्ज झाली आहे.

भारत-पाक सामन्याआधी गुजरात पोलिसांना धमकीचा ई-मेल आला होता. नरेंद्र मोदी स्टेडिअम बॉम्बने उडवून देण्याची धमकी यात देण्यात आली होती. पण पोलिसांना घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव गुजरात पोलिसांनी अहमदाबाद स्टेडिअमच्या आसपास नऊ गोष्टींवर बंदी घातली आहे.

स्टेडिअमच्या आसपाच्या परिसरात, ड्रोन, क्वाडकॉप्टर्स, पावर्ड एअरक्राफ्ट, मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, ग्लाइडर्स, पॅराग्लाडर्स, हॉट एअर बलून, पॅराशूट उडवण्याला बंदी असणार आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडिअमभोवती सहा हजार तर अहमदाबाद शहरात 11 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story