कपिल देव यांनाही न जमलेल्या 2 गोष्टी शामीने पहिल्याच मॅचमध्ये करुन दाखवल्या

पहिलाच सामना खेळला अन् सामनावीर झाला

'तो आला... त्याने पाहिलं... अन् जिंकून घेतलं सारं काही' अशाच शब्दांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या कामगिरीचं वर्णन करता येईल. त्याने थेट सामनावीर पुरस्कार जिंकला

पहिल्या चेंडूवर विकेट

वर्ल्ड कप 2023 मध्ये पहिल्यांदाच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळल्यानंतर मोहम्मद शामीने पहिल्या चेंडूवर विकेट घेत आमली चुणूक दाखवून दिली.

मोलाची भूमिका बजावली

या सामन्यामध्ये शामीने तब्बल 5 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या संघाला 300 धावांच्या आत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.

कपिल देव यांनाही जमलं नाही

या सामन्यामध्ये शामीने केलेली कामगिरी ही भारताला पहिल्यांदा 1983 साली वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनाही जमलेली नाही. शमीने अशी नेमका कोणता विक्रम केला आहे ते पाहूयात...

पहिल्यांदाच असं घडलं की

वर्ल्ड कपच्या 48 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका भारतीय दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. शमीने केलेली ही कामगिरी अनेकांना करता आलेली नाही.

पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम कोणी कोणी केला आहे?

यापूर्वी कपिल देव, व्यंकटेश प्रसाद, रॉबिन सिंग, आशीष नेहरा आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी एकदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. पण शमीने दुसऱ्यांदा हा पराक्रम करुन दाखवला आहे.

अनेकांना शामीने टाकलं मागे

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत शामीने अनिल कुंबळे, कपिल देव, जसप्रीत बुमराहलाही मागे टाकलं आहे.

सर्वात यशस्वी गोलंदाज कोण

सध्या भारतीय गोलंदाजांची आकडेवारी पाहिली तर जहीर खान हा सर्वाधिक म्हणजे 44 विकेट्स घेणारा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

शामीने घेतली मोठी झेप

त्या खालोखाल जवागल श्रीनाथ 44 विकेट्ससहीत दुसऱ्या स्थानी आहे मोहम्मद शामी 36 विकेट्सहीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

कपिल देव सहाव्या स्थानी

अनिल कुंबळे हे 31 विकेट्ससहीत चौथ्या तर जसप्रीत बुमराह 29 विकेट्सहीत पाचव्या स्थानी आहे. या यादीमध्ये कपिल देव हे 28 विकेट्ससहीत सहाव्या स्थानी आहे.

या 2 गोष्टी शामीने केल्या

म्हणजेच 5 विकेट्स 2 वेळा घेणे आणि 30 हून अधिक विकेट्स घेणे या दोन्ही गोष्टी कपिल देव यांना जमलं नाही ते शामीने करुन दाखवलं आहे.

VIEW ALL

Read Next Story