शुभमने पोस्ट केलेल्या फोटोवरुन 'सारा सारा' गोंधळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सरावादरम्यानचा शुभमन आणि इशानचा फोटो चर्चेत

भारतीय संघ इंग्लंडमध्ये

इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा सामना खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच इंग्लडमध्ये दाखल झाला आहे.

सरावही झाला सुरु

7 जून रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाने सरावही सुरु केला असून सरावाचे अनेक फोटो समोर आले आहेत.

विराटही गाळतोय घाम

विराट कोलही सुद्धा मैदानात सराव करताना दिसत आहे. विराट नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करतानाचे फोटो समोर आले आहेत.

इशानचाही संघात समावेश

इशान किशनचाही या संघात समावेश असून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

इशानचाही सराव

इशान किशनही कसून सराव करत असल्याचं अनेक फोटोंमध्ये पहायला मिळत आहे.

मज्जा मस्तीही

सरावाबरोबरच सर्व संघाची मज्जा मस्तीही मैदानात सुरु असल्याचं अनेक फोटोंमध्ये दिसत आहे. शुभमननेही असाच एक फोटो शेअर केला आहे.

एकत्र बैठक

पहिल्या फोटोत शुभमन आणि इशान किशन एका ड्रिंक्स बॉक्सवर बसून हसताना दिसत आहेत.

हसता हसता पडला

दुसऱ्या फोटोमध्ये शुभमन हसता हसता खाली पडल्याचं दिसत आहे. मात्र मी कशामुळे पडलो याबद्दल काही अंदाज व्यक्त करु शकता का असं शुभमनने चाहत्यांनाच विचारालं आहे.

चाहते म्हणतात गप्पा साराबद्दलच्या

अनेकांनी या फोटोवर कमेंट करुन तुम्ही साराबद्दल गप्पा मारत असाल असं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story