बाईक मार्केटला भेट

काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी नवी दिल्लीमधील करोल बाग येथील बाईक मार्केटला भेट दिली.

कामाबद्दलची सविस्तर माहिती

या ठिकाणी राहुल गांधींनी उमेद शाह, विक्की सेन आणि मनोज पासवान यांच्याबरोबर सर्व्हिसिंग आणि मेकॅनिकल कामाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली.

कमाबद्दल जाणून घेतलं

राहुल गांधींनी यावेळेस बाईक्सबद्दल माहिती घेतानाच मेकॅनिक्सकडून त्यांच्या कमाबद्दल जाणून घेतलं. तसेच बाईक या विषयावरही त्यांनी या मेकॅनिक्सबरोबर चर्चा केली.

तुमच्याकडे कोणती बाईक आहे?

यावेळी राहुल गांधींनी एका मेकॅनिकने तुमच्याकडे राहुल गांधींना, तुमच्याकडे कोणती बाईक आहे? असा प्रश्न विचारला.

राहुल गांधींनी सांगितलं आपल्या बाईकचं नाव

राहुल गांधींनी या प्रश्नाला उत्तर देताना, "माझ्याकडे केटीएम 370 बाईक आहे," असं या मेकॅनिकला सांगितलं.

व्यक्त केलं दु:ख

मात्र पुढच्याच वाक्यात राहुल गांधींनी यासंदर्भातील आपलं दु:ख व्यक्त केलं.

माझी बाईक पडून आहे

"माझ्याकडे केटीएम 390 असली तरी ती केवळ पडून आहे," असंही राहुल यांनी सांगितलं.

मी बाईक चालवत नाही कारण...

"मी बाईक चालवत नाही कारण माझे सुरक्षारक्षक मला त्याची परवानगी देत नाहीत," असं राहुल यांनी म्हटलं.

...तरी परिणाम होत नाही

मी अनेकदा यासंदर्भातील चिठ्ठ्या त्यांना देतो तरी परिणाम होत नाही, असंही राहुल यांनी बाईक न चालवता येण्यासंदर्भात सांगितलं.

केटीएम 390 ची किंमत नेमकी किती?

राहुल गांधींनी उल्लेख केलेल्या केटीएम 390 या बाईकची किंमत भारतामध्ये 3 लाख रुपयांहून अधिक आहे.

मेकॅनिक्सला सशक्त करणं आवश्यक

भारताच्या ऑटोमोबाइल उद्योगाला अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय मेकॅनिक्सला सशक्त करणं आवश्यक आहे, असंही या मेकॅनिक्सची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी सांगितलं.

मोठी गर्दी

राहुल गांधींना पाहण्यासाठी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी या वेळेस स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

VIEW ALL

Read Next Story