OLA कडून घसघशीत सूट! इलेक्ट्रिक स्कूटर आणि iPhone ची किंमत आता सारखीच

OLA इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरवर मोठी सूट जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या S1 X Plus मॉडेलची किंमत 20 हजारांनी कमी केली आहे.

आता किंमत किती?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, OLA S1 X Plus मॉडेलची किंमत आधी 1,09,999 रुपयांपासून सुरु होत होती. आता किंमत 20 हजारांनी कमी झाल्यानंतर स्कूटर 89 हजार 999 रुपये झाली आहे.

ओलाने ही सूट डिसेंबर टू रिमेंबरअंतर्गत जाहीर केली आहे. यामध्ये इतर सूटही देण्यात आल्या आहेत.

काही ठराविक क्रेडिट कार्डवर 5 हजारांची सूट, झिरो डाऊन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फीस आणि 6.99 टक्के व्याजदर सामील आहे.

S1 X Plus मॉडेलमध्ये कंपनीने 3kWH बॅटरी पॅक दिला आहे, जी सिंगल चार्जमध्ये 151 किमीची रेंज देते.

यामध्ये 6kW ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे, जी फक्त 3.3 सेकंदात ताशी 0 ते 40 किमीचा प्रवास करण्यात सक्षम आहे. याचा टॉप स्पीड 90 किमी आहे.

या स्कूटरमध्ये कंपनीने 5 इंचाचा स्मार्ट डिस्प्ले, ज्यामध्ये ड्रायव्हिंग रेंज, स्पीड, इंफोटेंमेट सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय यात कीलेस अनलॉक सिस्टमही मिळते.

ओलाच्या पोर्टफोलिओत S1X, S1 Air आणि S1 Pro मॉडेल आहेत. ज्यांची किंमत 89,999; 1,19,999 आणि 1,47,999 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story