iPhone मधील 'i' चा अर्थ काय? सुरुवात याच शब्दाने का होते?

स्मार्टफोन युझरला प्रत्येकाला iPhone ची क्रेझ असते. अगदी iPhone नाही तर मग iPad किंवा iMac तरी वापरला जातो.

अशावेळी तुम्हाला 'i' का वापरला जातो हा प्रश्न पडतो का, यामागचे कारण जाणून घ्या.

अ‍ॅप्पलच्या प्रत्येक प्रोडक्टची सुरुवात i पासून होते, परंतु तुम्हाला त्यामागील कारण तुम्हाला माहित आहे का?

iPhone, iPod, iMac, iPad मध्ये i चा वापर एका खास कारणामुळे केला जातो. ज्याला 5i देखील म्हटलं जातं.

अ‍ॅप्पलचे संस्थापक स्टीव्ह जॉब यांनी दिलेल्या माहितीनुसार, i चा संबंध थेट इंटरनेटशी आहे.

5i म्हणजे काय?

Individual - अ‍ॅप्पल आपले प्रोडक्ट प्रत्येक व्यक्तीच्या गरजांची खास काळजी घेऊन बनवते. तसेच सर्व्हिसवर खास लक्ष दिलं जातं.

i – Instruct - अ‍ॅप्पलचा प्रत्येक प्रोडक्ट जगावेगळा असतो. तसेच त्या प्रोडक्ट मधून ग्राहकांना शिकवण देखील मिळते.

i- Inform - अ‍ॅप्पलचा प्रयत्न असतो युजर्सना माहिती पर्यंत पोहचवण्याचा आणि कंपनीचे प्रोडक्ट युजर्सना माहितीपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम बनतात.

i - Inspire - अ‍ॅप्पल आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून लोकांना काही तरी वेगळं करण्याची प्रेरणा देतात.

i - Internet - अ‍ॅप्पलच्या प्रोडक्ट मध्ये इंटरनेट अत्यंत महत्वाचं आहे.

VIEW ALL

Read Next Story