चंद्रावर रोबोटिक लँडर्स आणि रोव्हर्सचा 200 टन पेक्षा जास्त स्पेस गार्बेज आहे. आंतराळवीर विसरलेल्या अनेक वस्तू देखील चंद्रावर पडल्या आहेत.

लुना 9 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे हे पहिले अंतराळयान आहे. चंद्राच्या पश्चिम भागावर हे यान उतरले होते.

अंतराळ संशोधनादरम्यान मृत्यू झालेल्या 14 शास्त्रज्ञांच्या नावाचा फलक देखील चंद्रावर आहे.

मलमूत्र आणि उलटीसाठी वापर करण्याच्या उद्देशाने नेलेल्या 96 पिशव्या येथे आहेत.

अपोलो-15 वर चंद्रावर गेलेले अंतराळवीर जेम्स इर्विन यांनी सोबत नेलेले बायबल येथे सोडले आहे.

अपोलो 11 मोहिमेत अंतराळवीर आर्मस्ट्राँग, आल्ड्रिन यांनी सिलिकॉनची 3.8 सेमी डिस्क सोडली. यावर 73 देशांतील नामवंत व्यक्तींचे संदेश आहेत.

बार्टलेट शेपर्ड चंद्रावर चालणारा पाचवा माणूस आहे. यांनी चंद्रावर दोन गोल्फ बॉल सोडले.

गुरुत्वाकर्षण तपासण्यासाठी पक्षाचे पख तसेच शांततेची प्रतिक म्हणून ऑलिव्ह पानाच्या आकाराचे सोन्याचे पान देकील येथे सोडण्यात आलेय.

चंद्रावर लँडिंग साइट कॅमेरे, पॉवर पॅक, चिमटे, ड्रिल, टॉवेल, ब्रश, रेक आणि ट्रेंचिंग टूल्स देखील आहेत.

VIEW ALL

Read Next Story