दिग्दर्शक विघ्नेश शिवनने त्याची पत्नी अभिनेत्री नयनतारा आणि त्यांची जुळी मुले, उईर आणि उलाग यांच्यासह त्याच्या घरी पहिली श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली.

या कार्यक्रमातील एक गोंडस फोटो समोर आला आहे.

विघ्नेश आणि नयनतारा यांचा ग्रॅंड लग्न सोहळा काही महिन्यापूर्वी पार पडला होता

लग्नाच्या काही महिन्यांनंतर म्हणजेच 9 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या घरी जुळ्या मुलांची जन्म झाला

त्यांच्या या जुळ्या मुलांची नावं उइर आणि उलाग अशी आहेत.

विघ्नेश नेहमीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचे फोटो शेअर करताना दिसतो.

त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर ते दोघं सगळे सण आणखी उत्साहनं साजरा करताना दिसत आहेत.

जन्माष्टमीच्या फोटोंमध्ये त्या दोघांनी पांढऱ्या रंगाचं धोतर नेसलं आहे. या व्यतिरिक्त विघ्नेश आणि नयनतारानं त्यांच्या घरातील देवघर खूप सुंदर सजवलं आहे. 

हे फोटो शेअर करत विघ्नेशनं कॅप्शन दिलं आहे की

 "आमच्या दोघं कृष्णांसोबत कृष्णजयंती! असे अनेक सुंदर, आशीर्वादित क्षण आले आहेत ! आमच्या उयिर आणि उलगला खूप प्रेम. कृष्ण जयंतीच्या शुभेच्छा, आशा आहे की प्रत्येक व्यक्तीला हा सण कुटुंब आणि मित्रांसोबत छान जावो."

VIEW ALL

Read Next Story