रोहित की सेहवाग? कोण भारी?

पाहा काय सांगतात आकडे!

आंतरराष्ट्रीय सामने

रोहित शर्माने आत्तापर्यंत 158 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर विरेंद्र सेहवागने एकूण 212 सामने खेळले आहेत.

वनडे धावा

रोहित शर्माने वनडेमध्ये 7892 धावा केल्यात. तर सेहवागने 7518 घावा कुटल्या आहेत.

सरासरी

रोहितच्या धावांची सरासरी नेहमी 55.97 राहिलीये. तर सेहवागने 36.50 धावांच्या सरासरीने आक्रमक फलंदाजी केलीये.

स्टाईक रेट

स्टाईक रेटच्या बाबतीत सेहवागचा नाद खुळा.. रोहितने 93.24 स्टाईक रेटने धावा केल्यात तर सेहवागाचा आकडा 104.71 पर्यंत गेलाय.

अर्धशतक

रोहितने आत्तापर्यंत 36 अर्धशतक झळकावली आहेत तर सेहवागच्या नावावर 35 अर्धशतक आहेत.

शतक

शतकांच्या बाबतील रोहित सरस ठरलाय. रोहितने 28 शतक तर सेहवागने 14 शतक ठोकली आहेत.

द्विशतक

कोणालाही जमलं नाही असा रेकॉर्ड रोहितचा नावावर आहे. तो म्हणजे 200 रन्सचा. रोहितने 3 वेळा द्विशतक झळकावलंय. तर सेहवागने देखील एकदा ही कामगिरी करून दाखवलीये.

सर्वोच्च धावसंख्या

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 264 धावांचा रेकॉर्ड रोहितच्या नावावर आहेत तर सेहवागची सर्वोच्च धावसंख्या 219 रन्स आहे.

VIEW ALL

Read Next Story