BCCI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कोटींच्या घरात मिळेल पगार

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय हे जगातील टॉपचे श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

बीसीसीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. येथील रिक्त पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

येथे जनरल मॅनेजरचे एक पद भरले जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

तुम्हीदेखील यासाठी अर्ज करु शकता पण नियम आणि अटींचे तुम्हाला पालन करावे लागेल. या रिक्त पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असेल, याची नोंद घ्या.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संबंधित कामाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असावा.55 वर्षाच्या आतील उमेदवारच यासाठी अर्ज करु शकतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक 3 ते 4 कोटी रुपये पगार मिळेल. याला अद्याप कोणता अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

26 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

VIEW ALL

Read Next Story