भारताचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचा आज 33 वा वाढदिवस आहे. BCCI ने देखील सूर्या ला सोशल मीडिया वर शुभेच्छा दिल्या आहेत.

Sep 14,2023


2010 साली सूर्या ने मुंबई साठी त्याच्या रणजी ट्रॉफी डेब्यू मध्ये 73 धावांची खेळी खेळली होती.


त्यानंतरच्या रणजी हंगामात 9 सामन्यात 754 धावा करून सूर्या आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा घेणारा खेळाडू ठरला.


पण 2012 मध्ये IPL डेब्यू करणाऱ्या सूर्यकुमारचा पहिला सीझन मात्र काही खास नव्हता.


असे असले तरीही त्याने 2018 मध्ये 512, 2019 मध्ये 424, 2020 मध्ये 480, , 2021 मध्ये 317, 2022 मध्ये 303 आणि 2023 मध्ये 605 धावा कुटल्या.


सूर्या चा टी20 डेब्यू 2021 साली झाला, आणि त्याने इंग्लंड व श्रीलंकेच्या विरुद्ध आपल्या पहिल्या तीन सामन्यात दोनदा अर्धशतकी खेळी केली.


टी 20 मध्ये सूर्याचा स्ट्राइक रेट 172.70 आहे जो या फॉरमॅट मधील सर्वाधिक आहे.


त्याचबरोबर तो जगातील एकमेव खेळाडू आहे जो तिन्ही सामन्यांच्या सिरिज मध्ये लागोपाठ 3 वेळा गोल्डन डक वर बाद झाला आहे.


पण आता चालू असलेल्या आशिया चषकात खेळण्याची संधी मात्र सूर्याला अजून मिळालेली नाही.

VIEW ALL

Read Next Story