तो क्रिकेटर, ती चिअरलीडर! आयपीएलमध्ये जुळलं प्रेम... 'या' क्रिकेटरची फिल्मी Love Story

Published by: Zee Team | Jun 03, 2023

आधी मैत्री, नंतर प्रेम

आयपीएल सामन्यानंतर क्विंटन दी कॉक आणि साशा हार्ली सुरुवातीला फेसबूकवर एकमेकांशी चॅट करु लागले. यातूनच त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Published by: Zee Team | Jun 03, 2023

फिल्मी लव्हस्टोरी

क्विंटन डी कॉक आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची लव्ह स्टोरीदेखील एका चित्रपटाला शोभेल अशीच आहे.

Published by: Zee Team | Jun 03, 2023

आयपीएलमध्ये चिअरलीडर

क्विंटन डी कॉकची पत्नी साशा हार्ली आयपीएलमध्ये चिअरलीडर होती. डी कॉक आणि साशाची ओळख आयपीएल स्पर्धेदरम्यानच झाली.

Published by: Zee Team | Jun 03, 2023

आयपीएलमध्ये जुळलं प्रेम

आयपीएलमध्ये डी कॉक त्यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातून खेळत होता. दिल्लीने एका सामन्यात विजय मिळवल्यानंतर साशाने फेसबूकवरुन डी कॉकला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

Published by: Zee Team | Jun 03, 2023

फेसबूकवरुन बोलणं

डी कॉकने ही तिला आभार व्यक्त करणारी कमेंट केली. त्यानंतर दोघांमध्ये फेसबूकवर बोलणं सुरु झालं. इथूनच दोघांमध्ये प्रेम फुलु लागलं. 2015 मध्ये डी कॉक आणि साशाची एंगजमेंट झाली आणि 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं.

Published by: Zee Team | Jun 03, 2023

मुलीचं नाव कियारा

2022 मध्ये डी कॉक आणि साशाला एक मुलगी झाली. त्यांनी तिचं नाव कियारा असं ठेवलंय. आपल्या मुलीचे फोटो ते अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Published by: Zee Team | Jun 03, 2023

सोशल मीडियावर सक्रिय

साशा हार्ली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिला प्राण्यांची आवड आहे. सोशल मीडियावर ती नेहमी आपल्या पाळीव प्राण्यांबरोबरचे फोटो शेअर करत असते.

Published by: Zee Team | Jun 03, 2023

साशाला पर्यटनाची आवड

याशिवाय साशाला पर्यटनाची प्रचंड आवड आहे. पती डी कॉकबरोबर ती अनेक देशांमध्ये फिरत असते.

Published by: Zee Team | Jun 03, 2023

लखनऊ संघाचा खेळाडू

क्विंटन डी कॉक आयीएलच्या सोळाव्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळला. त्याला केवळ 4 सामन्यांमध्येच संधी देण्यात आली. या चार सामन्यात त्याने 143 धावा केल्या.

Published by: Zee Team | Jun 03, 2023

VIEW ALL

Read Next Story