भारतात झालेल्या विश्वचषकातील खराब कामगिरी तसेच नुकत्याच झालेल्या विंडीज सिरीजमध्ये इंग्लंडला दारुण पराभव झाला.
येणाऱ्या 2024 च्या T-20 विश्वषकासाठी इंग्लंडचा संघ वेगळी रणनीती आखत आहे.
खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वेस्ट इंडीजचा माजी धडाकेदार खेळाडू कायरन पोलार्ड आहे.
2024 ला होणारा विश्वचषक वेस्ट इंडिज मध्ये होणार आहे.
पोलार्ड हा वेस्ट इंडीजचा असल्या कारणाने त्याला तिथल्या परिस्थितीचा चांगलाच अंदाज असेल. ही बाब इंग्लंडला फायद्याची ठरू शकते.
2022 मध्ये झालेल्या विश्वचषक सामन्यात माईक हसी याने ही भूमिका बजावली होती आणि इंग्लंडने विश्वकप ही जिंकला होता.
इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) 2024 मध्ये होणाऱ्या T-20 विश्वचषासाठी सल्लागार कोच म्हणून पोलार्डची नेमणूक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.