बरेचसे विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यापैकी रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी रेल्वे भरती परीक्षांचा अभ्यास करतात.
रेल्वेच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी अभ्यासक्रम समजून घेणे अत्यावश्यक आहे. अभ्यासक्रमात कोणत्या विषयांचा समावेश केला आहे तसेच कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे जाणून घ्या.
जर तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाच्या योग्य पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. जाणून घ्या काय आहे अभ्यास करण्याची योग्य पद्धत?
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे हे अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे तुम्ही प्रत्येक विषयाला वेळ देऊ शकाल आणि अभ्यासक्रम पूर्ण करु शकाल. विश्रांतीसाठीचा वेळ सुद्धा वेळापत्रकात नमूद करा.
वेळोवेळी मॉक टेस्ट दिल्याने आपण आपल्या कमतरतेविषयी जाणून घेऊ शकतो जेणेकरुन आपण त्याकडे जास्त लक्ष देऊ शकतो.
रेल्वेच्या परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, हिंदी, इंग्रजी अशा विषयांचा समावेश असतो परंतु यात सामान्य ज्ञान या विषयाकडे अधिक लक्ष द्यायला हवं कारण या विषयाला अधिक गुण असतात.
अभ्यास करतेवेळी नोट्स काढणे गरजेचे आहे. त्यासोबतच काढलेल्या नोट्सचं वेळोवेळी रिवीजन करा जेणेकरुन अभ्यासक्रम लक्षात ठेवण्यास मदत होईल.
रेल्वेच्या परीक्षांमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक विषयासाठी निश्चित वेळ असतो. त्यामुळे विद्यार्थ्याने वेळेचं बंधन लक्षात घेऊन प्रश्न सोडवताना वेग वाढवण्याचा सराव करावा. ज्यामुळे सर्व प्रश्न वेळेत सुटतील.
रेल्वेच्या परीक्षांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन आरआरबी (RRB) ची पुस्तके उपलब्ध असतात. या पुस्तकांचा वापर करुन तुम्ही परीक्षेसाठी तयारी करु शकता.
रेल्वेच्या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामुळे अशीच प्रश्न सोडवा ज्यासंबंधी तुम्हाला खात्री आहे.