'क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा। आंखे निकालकर गोटियां खेलता हूं।' हा डायलॅाग प्रसिद्ध करणारं पात्र 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात शक्ती कपूर यांनी साकारलं होत.
'राजा बाबू' या चित्रपटात नायकाच्या मित्राची भूमिका त्यांनी साकारली होती. हा मित्र गतिमंद आणि भोळसट असला तरीदेखील नायकाप्रति प्रामाणिक होता.
'चालबाज' या चित्रपटात शक्ती कपूर यांनी 'बटुकनाथ' या एका लबाड वकिलाची भूमिका साकारली होती.
(हिम्मतवाला) या सिनेमात त्याने शक्ती 'गोपाळदास' या भ्रष्टाचार करणाऱ्या खलनायकाचं पात्र साकारलं होतं. या पात्राने सिनेमाचं कथानक आणखी थरारक केलं होतं.
'बाप नंबरी बेटा दस नंबरी' हा गुन्हेगार पिता पुत्राची जोडी असणारा सिनेमा होता. या सिनेमातील शक्ती कपूर यांची प्रसाद ही भूमिका विशेष गाजली.
या चित्रपटातील त्यांनी साकारलेला खलनायक हा विचित्र स्वभावाचा असला तरी हा खलनायक सिनेमाच मुख्य आकर्षण ठरला.
(हिरो) या चित्रपटात त्यांनी एका क्रूर गुंडाची भूमिका साकारली होती. या पात्राने सिनेमात भीतीदायक वातावरण निर्माण केलं.
'रॅाकी' या चित्रपटात शक्ती कपूर यांनी खलनायकाची भूमिका दमदारपणे साकारली होती. संजय दत्त या प्रमुख नायकाच्या विरोधात उभ्या असणाऱ्या या भूमिकेने सिनेमाच्या कथेला अधिक रंजक बनवलं.
'मैं खिलाडी तू अनाडी' या सिनेमात शक्ती कपूर यांनी विनोदी खलनायकाची भूमिका साकारली होती.
(कुर्बानी) एका मित्राचं शत्रूत होणार रूपांतर दाखवणारी 'विक्रम सिंग' ही व्यक्तिरेखा 'कुर्बानी' या सिनेमातून कपूर यांनी साकारली.त्यांच्या गाजलेल्या सिनेमांपैकी हा सिनेमा होता. (फोटो सौजन्य : गुगल)