'आई कुठे काय करते' मालिकेतून रुपाली भोसले हिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्रीने स्वत:साठी नवीन अलिशान कार खरेदी केली आहे.
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
रुपाली भोसलेने मर्सिडीज बेंझ ही अलिशान कार खरेदी केली आहे.
यावेळी शोरुम देखील रुपालीच्या फोटोंनी आणि फुग्यांनी सजवलेलं पाहायला मिळत आहे.
2024 मध्ये अभिनेत्रीने स्वत: साठी घर तर भावासाठी अलिशान कार खरेदी केली होती.