या फोटोतल्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का? हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो आहे असं वाटेलच ना...

हो, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे आरती सोळंकी आहे. तिची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा आहे.

तुम्हाला माहितीये का की तिनं चक्क तिचं वजन कमी केलं आहे आणि आता तिचा हा नवा लुकमधील फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

आरतीनं अनेक मालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहेत. तिनं फू बाई फू या मालिकेतूनही अनेक विनोदी स्किट केले.

रेगे चित्रपटातील जपून दांडा धर.. हे गाणं आरतीचं आहे. ती बिग बॉसमध्येही दिसली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार तिनं 50 किलो वजन कमी केलं आहे.

आरतीनं राजश्री मराठीला मुलाखत गिली त्यात तिनं याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की ती सात-आठ तास चालते. ती सकाळी नाश्ता तर दुपारी भाकरी किंवा पोळी खाते. रात्री झोपताना दूध पिते.

तिचे वजन आधी 132 किलो इतके होते. नियमित डाएट आणि व्यायामानं तिनं आपलं हे वजन कमी केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story