अक्षय कुमार हा वर्षभरात अनेक चित्रपट प्रदर्शित करत असतो. तो वेळेचा पक्का आहे. तो नेहमी वेळेवर झोपतो आणि फिटनेसची पूर्ण काळजी घेतो.
विवेक ओबेरॉयने एका मुलाखतीत एक खुलासा केला होता की, अक्षय कुमारने त्याला डिनरसाठी बोलावले होते.
त्यावेळी विवेकसोबत रितेश देशमुखही त्याच्या घरी जेवायला आला होता. रात्री 9.30 वाजता तो अक्षय कुमारच्या घरी पोहोचला.
त्यावेळी त्यांना वाटले अक्षय वॉशरुमला गेला असावा. त्यानंतर तो 10.30 वाजता गेला त्यावेळी देखील अक्षय आला नाही.
त्याच वेळी अक्षय कुमारची बायको आली आणि म्हणाली की, तुम्ही सगळे जा, तो आधीच झोपला आहे. आम्ही सगळे आश्चर्यचकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो.
त्यानंतर विवेक म्हणाला की, अक्षय त्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहे. त्याची स्वत: ची दिनचर्या आहे. तो 9 वाजता झोपतो हे सर्वांनाच माहिती आहे.