अभिनेता सुयश टिळकची पत्नी आयुषी भावे-टिळक सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
आयुषीने नुकतेच एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी आयुषीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.
याचबरोबर आयुषीने या साडीसोबतच हेव्ही दागिने परिधान केले आहेत
या लूकला पुर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप आणि केसांचा आंबाडा घातला आहे.
याचबरोबर तिने केसात फुलांचा गजरा माळला आहे. जो तिचा लूक अजूनच खुलवत आहे.
हे फोटो शेअर करत तिने 'खामोशियां गुनगुनाने लगी…' असं कॅप्शन दिलं आहे.