बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान ,पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूर आणि दोन मुलांसह मुंबईत अलिशान घरात राहातो
पण खान कुटुंबियांचा एक अलाशीन बंगलाही आहे. ज्याचं नाव पटौदी पॅलेस असं आहे. हरियाणातल्या गुरुग्राममध्येहा भव्य बंगला आहे.
पटौदा पॅलेस एका राज्यवाड्यासारखा भव्य आणि सुंदर आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 800 कोटी रुपये इतकी आहे.
या बंगल्यात सैफ आली खानची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टॅगोर आणि त्यांची बहिण सबा अली खान राहातात.
जवळपास 80 वर्षांपूर्वी सैफ अली खान यांचे आजोबा इफ्तियार अली खान यांनी हा बंगला बांधला. या पॅलेसमध्ये जवळपास 150 खोल्या आहेत.
पटौदी पॅलेसमध्ये सात मोठ्या खोल्या आणि सात ड्रेसिंग रुम असल्याचं सांगितलं जातं. या पॅलेसची देखभाल करण्यासाठी 100 नोकर तैनात असतात.
नवाब कुटुंबात मंसूर अली खान हे नववे नवाब होते. त्यानतंर आता सैफ अली खान या कुटुंबातील दहावा नवाब आहे.
पटौदी पॅलेसमध्ये बॉलिवू़डच्या अनेक चित्रपटांचं शुटिंगही झालंय. यात ज्युलिया रॉबर्ट, मंगल पांडे, गांधी माय फादर, मेरे ब्रदर की दुल्हनिया या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे
वडिलांच्या निधनानंतर पटौदी पॅलेस हॉटेलसाठी देणं चांगलंच महगात पडलं होतं. ते परत घेण्यासाठी सैफ अली खानला पाण्यासारखा पैसा ओतावा लागला.