अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

मालिका, नाटक आणि त्यानंतर सिनेमा अशा माध्यमात तिने आपला ठसा उमटविला आहे.

ती महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते. तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे.

अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

सोशल मीडियाच्या विश्वात सुद्धा तिने निराळी प्रसिद्धी मिळवली आहे.

नुकतंच हृताने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

मोकळे केस लाईट मेकअप, आणि भगव्या रंगाचा सुंदर वनपीस असा हृताचा यावेळी लूक आहे.

VIEW ALL

Read Next Story