अश्लील MMS लिक झाल्याने 'या' अभिनेत्री सापडल्या वादात; माजली एकच खळबळ

छेडछाड केलेले व्हिडीओ अन् फोटो

रश्मिका मंधानाच्या डीप फेक व्हिडीओची सध्या चर्चा आहे. मात्र अशाप्रकारे नावाजलेल्या कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओंबरोबर छेडछाड करुन ते व्हायरल केल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात.

अनेक कलाकार आहेत या यादीत

मात्र कधीकधी या कलाकारांचे खासगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल होतात आणि या कलाकारांना मनस्ताप सहन करावा लागतो. असा प्रकार ज्यांच्याबरोबर घडलाय त्या कलाकारांबद्दल जाणून घेऊयात...

दाक्षिणात्य अभिनेत्रींचा समावेश

एमएमएस लिक झाल्याने अडचणीत आलेल्या अभिनेत्रींमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्रींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामध्ये अगदी नयनतारापासून त्रिशापर्यंत अनेक अभिनेत्री आहेत.

नयनताराचं एमएमएस प्रकरण

दाक्षिणात्य नयनतारा ही तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच एमएमएस प्रकरणामुळे चर्चेत आलेली. त्यावेळेस ती तमिळ अभिनेता सिम्बूबरोबर रिलेशनमध्ये होती.

फोटोमुळे झालं ब्रेकअप झालेलं

सिम्बूबरोबरचा नयनताराबरोबरचा किसिंग व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ तिचा बॉयफ्रेण्ड सिम्बूनेच जारी केलेला. यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

त्रिशाही अडकेलेली या प्रकरणात

प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशाही अशाप्रकारे करिअरच्या सुरुवातीला एमएमएस प्रकरणात अडकेलेली. किसिंगचा हा व्हिडीओ खोटा असल्याचा खुलासा त्रिशाने केला होता. हा एडिटेड व्हिडीओ असल्याचं ती म्हणालेली.

आक्षेपार्ह अवस्थेत आढळलेली अभिनेत्री

अभिनेत्री ज्योतिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला. यामध्ये अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याने ती वादात सापडलेली.

सर्वात वादग्रस्त फोटोंपैकी एक

राणा दुग्गुबातीचा भाऊ अभिराम दुग्गुबातीबरोबर अभित्री श्री रेड्डीचा फोटो व्हायरल झाला होता. हा टॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त फोटोंपैकी एक ठरलेला.

रजनीचा भाचाही आलेला चर्चेत

रजनीकांतचा भाचा अनिरुद्ध रविचंद्रही या वादात अडकलेला आहे. या तरुण संगीतकाराचा अभिनेत्री अॅण्ड्रूसबरोबर किस करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालेलं.

किस करतानाचा फोटो व्हायरल

कन्नड अभिनेत्री अमुल्यचा चित्रपट निर्माते रथनजाबरोबरचा किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरुन बराच वाद झालेला.

VIEW ALL

Read Next Story