समांथा रुथ प्रभूनं अभिनय क्षेत्रातून सध्या ब्रेक घेतला आहे.
समांथाला गेल्यावर्षी ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हणजेच मायोसायटिस या आजाराचे निदान झाले होते. त्यामुळे तिनं ब्रेक घेतला आहे.
'न्यूज 18' आणि 'इंडिया हेराल्ड' च्या रिपोर्ट्सनुसार, समांथा राजकारणात प्रवेश करण्यासाठी तयार आहे. अजून या विषयी कोणतीही थेट माहिती समोर आलेली आहे.
दरम्यान, आता चर्चा अशी सुरु आहे की ब्रेकनंतर समांथा राजकारणात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जाते.
समांथा ही नेहमीच शेतकऱ्यांचे समर्थन करताना दिसते. आधी देखील तेलंगनाच्या शेतकऱ्यांचे समर्थन करताना दिसला आहे. इतकंच नाही तर ती हॅन्डलूम कपड्यांच्या ब्रँडची अम्बॅसीडर आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशा चर्चा आहेत की समांथा हे के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिति (BRS) या पक्षात सहभागी होणार.
समांथा किंवा के. चंद्रशेखर राव या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही किंवा त्यांच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीनं या बातमीवर शिक्का मोर्तब केलेला नाही. (All Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)