6 लाखांच्या कारने उडवली सर्वांची झोप; Tata, Mahindra लाही टाकलं मागे, ग्राहकांच्या खरेदीसाठी उड्या
ऑगस्ट महिन्यात विक्री झालेल्या वाहनांचा सेल्स रिपोर्ट आला आहे. ऑगस्ट महिना अनेक कारनिर्माता कंपन्यांसाठी चांगला राहिला.
पण ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीच्या एका छोट्या कारला मिळालेल्या मागणीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या हॅचबॅक कारच्या मागणीत अचानक 65 टक्के वाढ झाली आहे.
Maruti Swift ने विक्रीच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकलं असून देशातील बेस्ट सेलिंग कार ठरली आहे.
ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीने या कारच्या एकूण 18,653 युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षी 11,275 युनिट्सची विक्री करण्यात आली होती.
दुसऱ्या क्रमांकावर Maruti Baleno असून, कंपनीने एकूण 18 हजार 516 युनिट्सची विक्री केली. मागील वर्षी हा आकडा 18,418 होता.
मारुतीची टॉल बॉय म्हणून ओळखली जाणारी Maruti Wagon R देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. या कारच्या एकूण 15,578 युनिट्सची विक्री झाली आहे.
Maruti Brezza देशातील चौथी आणि सर्वाधिक विकली जाणारी एसयुव्ही ठरली आहे. एसयुव्ही सेगमेंटमध्ये तिने सर्वांना मागे टाकलं आहे. याच्या एकूण 14,572 युनिट्सची विक्री झाली आहे.
टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त एसयुव्ही Punch पाचव्या क्रमांकावर आहे. कंपनीने या कारच्या एकूण 14,523 युनिट्सची विक्री केली आहे.